Saturday, 11 April 2026

नवीन कामगार संहितेमुळे वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षितता या क्षेत्रांमध्ये

 प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांनी नवीन कामगार संहितेमुळे वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षितता या क्षेत्रांमध्ये एकसंध व सुसंगत कायदेशीर चौकट निर्माण होऊन यामुळे कामगारांना अधिक सुरक्षितता, आरोग्यदायी कामाचे वातावरण आणि सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील, तसेच उद्योगांना प्रक्रियेत सुलभता आणि स्पष्टता प्राप्त होईल, असे नमूद केले.

या कार्यक्रमात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक दीपक पोकळे यांनी प्रास्ताविक करताना नवीन कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विषयावर पॅनल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता, २०२० या विषयावर प्रशिक्षण सत्रही पार पडले. औद्योगिक सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दि. १२ एप्रिल २०२६ रोजी नवी मुंबईतील पाल्म बीच रोड येथे Run for OSH-2026 या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi