Saturday, 4 April 2026

माओवादाविरुद्ध लढा दिलेल्या सी-60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्यात येणार

 माओवादाविरुद्ध  लढा दिलेल्या सी-60 जवानांना

राज्य शासनामार्फत विशेष सी-60 पदक’ देण्यात येणार

                                                                                    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 30 : माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता  माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. त्यामुळे  किमान तीन वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष सी-60 पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली. या परिषदेस गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयरगृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदममुख्य सचिव राजेश अग्रवालगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरपोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच भारतीय पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi