गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त आयोजन
मुंबई, दि. 13 : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 25 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा , जलसंपदा लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment