Thursday, 26 March 2026

‘पल्स वैद्यकीय परिषद’ २७ व २८ मार्च रोजी

       पल्स वैद्यकीय परिषद’ २७ व २८ मार्च रोजी

 

मुंबईदि. २४ : राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदारसुलभ आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पल्स वैद्यकीय परिषद’ दिशादर्शक ठरणार आहे. २७ व २८ मार्च २०२६ रोजी जिओ कन्व्हेशन सेंटर येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारवैद्यकीय व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी यांच्या उपस्थितीत परिषदेचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. देश तसेच विदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील सुमारे २,९०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत डिजिटल हेल्थकृत्रिम बुद्धिमत्तावैद्यकीय शिक्षणातील सुधारणाकौशल्य विकाससंशोधन व नवकल्पनातसेच ग्रामीण व सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi