Thursday, 26 March 2026

वार्षिक ‘सशक्ती कॉन्क्लेव्ह २०२५-२६’ मध्ये महिला उद्योजकांच्या यशाचा गौरव

 आयोजित वार्षिक सशक्ती कॉन्क्लेव्ह २०२५-२६’ मध्ये महिला उद्योजकांच्या यशाचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमातून महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहनवित्तीय सुविधा आणि विविध शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सशक्त महिला उद्योजकता कार्यक्रम हा पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतील कमी उत्पन्न गटातील महिला उद्योजकांना आर्थिक साक्षरताडिजिटल साधने आणि व्यवसाय नियोजन कौशल्य देण्यासाठी तयार करण्यात आलेला एक अनोखा उपक्रम आहे.

लर्निंग लिंक्स फाउंडेशनद्वारे राबविण्यात येणारा आणि मास्टरकार्डच्या सहकार्याने चालणारा हा कार्यक्रम २०२२ पासून महाराष्ट्रदिल्लीगुजरातकर्नाटकतेलंगणाउत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पोहोचला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi