Wednesday, 18 March 2026

जिवती (जि. चंद्रपूर) येथील शेणगाव वन उपक्षेत्रातील सागवान तस्करी प्रकरणाची पुन्हा चौकशी

 जिवती (जि. चंद्रपूर) येथील शेणगाव वन उपक्षेत्रातील

सागवान तस्करी प्रकरणाची पुन्हा चौकशी

- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबई, दि.१८ : जिवती (जि. चंद्रपूर) येथील शेणगाव वन उपक्षेत्रातील सागवान तस्करी प्रकरणात  १५ सप्टेंबर २०२५ रोजी गस्तीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना संशयास्पद लावारिस अवैध लाकूड आढळून आले. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात पुन्हा चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत दिली.

जिवती तालुक्यातील शेणगाव वन उपक्षेत्रातून अवैध सागवान तस्करी होत असल्याबाबत विधानसभेत सदस्य देवराव भोंगळे यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत विजय वडेट्टीवार व सुमित वानखेडे यांनी सहभाग घेतला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi