प्राचीन मंदिरांच्या जतन व जीर्णोद्धारासाठी जैन समाजाने पुढाकार घ्यावा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या जतन आणि जीर्णोद्धारासाठी जैन समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जैन समाजाने ज्ञान संवर्धनाबरोबरच प्राचीन वारशाच्या जतनासाठीही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. जैन समाजाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून ते म्हणाले, प्राचीन हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी होत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. सुमारे सात कोटी प्राचीन हस्तलिखितांचे जतन व संवर्धन तसेच प्राचीन जैन मंदिरांच्या संरक्षणाचे कार्य संस्थेकडून करण्यात आले.
अहिंसा ही केवळ शारीरिक हिंसेपुरती मर्यादित नसून विचारांमध्येही हिंसा नसावी, हा संदेश जैन तत्त्वज्ञान देते. आजच्या भौतिक जीवनशैलीच्या युगात सर्वकाही सोडून दीक्षा घेणे हे अत्यंत मोठे आणि दृढ निश्चयाचे कार्य आहे. जैन समाजाने आपल्या कार्यातून देशासमोर एक आदर्श निर्माण केला असून, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत मोठे योगदान देतानाच दान-पुण्याच्या क्षेत्रातही जैन समाज अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या कार्यक्रमात जैन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त - 'अष्ट द्रव्य' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन पूजा साहित्य प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment