Friday, 20 March 2026

वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र हस्तांतरणाबाबत शासन सकारात्मक

 वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र हस्तांतरणाबाबत शासन सकारात्मक

-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई,दि.१६ : वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या विषयावर शासन सकारात्मक असून या संदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान सभेत दिली.

 विधानसभा सदस्य स्नेहा दुबे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

      आरोग्य व शिक्षण विभागाशी संबंधित विषयांच्या हस्तांतरणाबाबत १६ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत ग्रामविकासआरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित काही विषय महानगरपालिकेकडे वर्ग करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १२ उपकेंद्रांच्या हस्तांतरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागांमध्ये चर्चा सुरू असून लवकरच याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंत्री आबिटकर 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi