Sunday, 22 March 2026

खडकवासला फुरसुंगी बोगदा कामाला वेग; जुन्या कालव्याच्या पुनर्वापराचा विचार

 खडकवासला फुरसुंगी बोगदा कामाला वेग;

जुन्या कालव्याच्या पुनर्वापराचा विचार

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. १७ : खडकवासलामुळशी परिसरातील खडकवासला फुरसुंगी भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून त्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहेअशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली. या प्रकल्पासोबत खडकवासला धरणातून निघणाऱ्या सुमारे ३० ते ३२ किलोमीटर लांबीच्या जुन्या कालव्याच्या पुनर्वापराबाबतही शासन धोरण ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभेत खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पचिबड जमिनीच्या संदर्भातील धोरणटाटा पॉवरचे पाणी मिळणे व उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर बॅरेज बांधणे आदी प्रश्नांसंदर्भात सदस्य ॲड.राहुल कुल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी सदस्य विजय शिवतारेविक्रम पाचपुते आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi