Saturday, 21 March 2026

सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार

 सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी

सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

 

मुंबई, दि. २० : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारासाठी विशेष पुढाकार घेतला.

या करारावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, उपसचिव चंद्रकांत विभुते, सीआयएफएफ कडून डॉ. हेमांग शाह व डॉ. अस्मिता जैन, तसेच आय पी आय कडून राघवेश राजन आणि अविधा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi