साखर उद्योगासाठी मदतीचा निर्णय
राज्यातील विविध क्षेत्रांच्या विकासासाठी शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले असून, शेती, उद्योग, पर्यावरण आणि गृहनिर्माण या क्षेत्रांना चालना देण्यावर भर दिला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
राज्यात साखर उद्योगासमोर एफआरपी देयके आणि पुढील हंगामाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार असून, राज्यस्तरावर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठीही पावले उचलण्यात येत आहेत. महाराष्ट्रात देशातील सुमारे 50 टक्के कांदा उत्पादन होते. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मॉरिशसला 1 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीचा विचार सुरू असून, दीर्घकालीन उपाय म्हणून पिकांचे वैविध्यीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment