Friday, 20 March 2026

बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार

 बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व ‘मॅग्नेट’ प्रकल्पासाठी एडीबी सहकार्य करणार

  • पणन मंत्री जयकुमार रावल यांचा मनीला दौरा फलदायी

 

मुंबई, दि. २० : महाराष्ट्रातील कृषी बाजार व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी आशियाई विकास बँकेचे (एडीबी) सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने पणन मंत्री जयकुमार रावल यांचा मनीला दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित ‘आशिया आणि पॅसिफिक अन्न प्रणाली मंच २०२६’ मध्ये सहभागी होत मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, मुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजार (एमआयएएम) आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi