परिषदेमुळे महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र बनवण्यास मदत - मंत्री हसन मुश्रीफ
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित PULSE 2026 परिषदेमुळे महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र बनवण्यास, इनोव्हेशन हब विकसित करण्यास आणि हेल्थकेअर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला चालना देण्यास मोठी मदत होणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सार्वजनिक, खाजगी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत तज्ञ, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि औषध कंपन्यांसोबत दर्जेदार शिक्षण टिकवण्यासाठी व्यापक चर्चा झाली.
एकूणच, PULSE 2026 च्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, गुंतवणूक आणि आरोग्य क्षेत्रातील “हेल्थ सिटी” संकल्पनेला बळकटी मिळाल्याचा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment