Friday, 20 March 2026

राज्यात आठ ठिकाणी आयोजन

 राज्यात आठ ठिकाणी आयोजन

            पंजाबी भक्ती गीत, भांगडा नृत्य आणि नाट्यमय प्रसंग अशा कलाविष्कारांनी युक्त 60 कलावंतांनी साकारलेला हा सांस्कृतिक सोहळा आहे. या 'हिंद दी चादर'  सांस्कृतिक कार्यक्रमाचे राज्यात आठ ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. वाशी, मिरा रोड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगांनंतर आता अकोला, नागपूर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड येथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

            हा सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,  असे आवाहन राज्य शासन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभाग संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi