Friday, 27 March 2026

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मिशन अंतर्गत महिला मॉल

 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मिशन अंतर्गत महिला मॉल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार महिलांच्या उद्योजकतेला बळकटी देण्यासाठी बाजार जोडणीडिजिटल प्रवेशआर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास यावर भर देत असल्याचे पणन मंत्री रावल यांनी सांगितले. पणन विभागामार्फत आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने सुमारे २ हजार कोटी रुपयांचा मॅग्नेट हा कापणी पश्चात विकास प्रकल्प राबविण्यात येत असूनद्राक्षांपासून मनुकाप्राथमिक प्रक्रियापॅकेजिंगब्रँडिंग आणि विक्री यासारख्या उपक्रमांसाठी ६० टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांना सातत्याने बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मिशन अंतर्गत महिला मॉल उभारले जात आहेत. जिल्हा स्तरावर उभारल्या जाणाऱ्या या मॉलमध्ये केवळ महिला उद्योजकांच्या उत्पादनांनाच स्थान मिळेलमध्यस्थांचे जाळे कमी होऊन थेट संधी उपलब्ध होईल आणि त्यामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ होईलअसा विश्वास पणनमंत्री रावल यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi