विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भावी आयुष्याच्या स्वप्नांचा सन्मान
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, सुनेत्रा पवार म्हणाल्या की, रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचा हा दीक्षांत सोहळा ऐतिहासिक आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भावी आयुष्याच्या स्वप्नांचा आज सन्मान होत आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. त्याअनुषंगाने केंद्रासोबतच राज्य सरकार ही कार्यरत आहे. मला सांगायला आनंद वाटतोय औंध येथील आयटीआय अतिशय अत्याधुनिक आणि रोजगाराभिमुख करण्यात आले आहे. कौशल्य विभागाच्या दक्ष आणि नुकतेच आकाराला आलेले महिमा योजनांमुळे राज्यभरात कौशल्य विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून नवदिशा केंद्र राज्यातील ३६ ठिकाणी उभारण्यात येत कौशल्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री महाफंड योजनेमुळे प्रतिभावान तरुणांच्या पंखांना नवे बळ मिळणार आहे. उद्योजक होण्यासाठी नवे द्वार उघडले जाणार आहे. नव्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांनी स्वतः ला बदलले पाहिजे. देशाच्या सर्वांगीण विकासाला आकार देणारे घटक म्हणून तरुणांकडे पाहिले जाते, त्यांनी नैतिकेच्या मूल्यांवर सामाजिक बांधिलकी ही जपली पाहिजे. आता पदवी घेऊन जागतिक स्पर्धेत उतरणाऱ्या सर्व पदवीधारकांचे अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते.
No comments:
Post a Comment