Sunday, 22 March 2026

कौशल्य विकास हा आत्मनिर्भर भारताचा कणा -

 कौशल्य विकास हा आत्मनिर्भर भारताचा कणा - मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचे काम सुरू आहे. प्राचीन काळी भारताला सोने की चिडिया’ म्हटले जायचेत्यामागे केवळ कृषी नव्हे तर प्रत्येक घरातील कौशल्य ही मोठी ताकद होती. प्रत्येक कुटुंबातून सूक्ष्म उद्योग उभे राहत होते. हीच परंपरा पुन्हा जोपासण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासन मजबूत असूनआता कौशल्य क्षेत्रात आणखी प्रगती करण्यावर भर दिला जात आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते पहिला दीक्षांत समारंभ पार पडणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे त्यांच्या करिअरला अधिक बळ मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi