Wednesday, 18 March 2026

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 तीर्थ विठ्ठलक्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबई दि 18 : तीर्थ विठ्ठलक्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज प्रकाशन करण्यात आले.

 

यावेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरेज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ.अश्विनी भिडे-देशपांडेकॉफीटेबल बुकचे निर्माते विनोद पवारमाजी खासदार विनय सहस्त्रबुद्धेमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे तसेच शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीअतिशय सुंदर अशा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करता आले याबद्दल अतिशय आनंद आहे. महाराष्ट्राचे प्रतिबिंब हे आपल्याला आपल्या वारीमध्ये दिसतेते पंढरपुरात दिसतेते विठ्ठलाच्या आराधनेत आपल्याला पाहायला मिळते. इतक्या वेगवेगळ्या कथाप्रत्येक वारीमध्ये तयार होतात. ते सर्व कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेतीर्थ आणि त्या तीर्थातला जो देव आहेहे दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्याची माहिती, इतिहास किंवा त्यातल्या प्रमुख गोष्टी या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मिळाले.  माहिती आणि छायाचित्रे यामुळे हे कॉफी टेबल बुक संग्रहणीय झाले आहे. आपली सांस्कृतिक माहिती जर कोणाला द्यायची असेलतर काय द्यावे तर यामध्ये या पुस्तकाचा समावेश झाला आहे. इन्टॅन्जिबल हेरिटेजमध्ये युनेस्कोला आता ही पंढरीची वारी सादर करण्यात येईल, यासाठी हे कॉफी टेबल बुक महत्त्वाचे ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतिले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi