Friday, 20 March 2026

महावितरणने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत विजेचे दर कमी होतील २०२९ पर्यंत वीजदरात स्थिरता येणार

 महावितरणने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे

पुढील पाच वर्षांत विजेचे दर कमी होतील

२०२९ पर्यंत वीजदरात स्थिरता येणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१७ :- महाराष्ट्र महावितरण कंपनीने  १ लाख कोटी रुपयांचा  वर्षाचा महसूलाचा टप्पा पार करून देशातील सर्वात मोठी कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे आता राज्यातील उद्योगांना, 'सोलर अवर्स'मध्ये (सकाळी ९ ते ५) वीज वापरल्यास २५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. महावितरणने केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत विजेचे दर वाढण्याऐवजी दरवर्षी १.२ टक्क्यांनी कमी होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

आमदार चेतन तुपे यांनी सौर ऊर्जेचा लाभ कमी झाल्यामुळे वीज देयकात वाढ होत असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi