Sunday, 22 March 2026

२५,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतल्या कौशल्य आधारित प्रमाणपत्रे व पदव्या

 २५,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतल्या कौशल्य आधारित प्रमाणपत्रे व पदव्या

- कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर

कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर या प्रास्ताविकात म्हणाल्या कीरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्यात २५,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपली प्रमाणपत्रे आणि पदव्या प्राप्त केल्या आहेत. हा विद्यापीठाच्या वाटचालीतील एक मैलाचा दगड असल्याचे डॉ.पालकर यांनी नमूद केले. विद्यापीठाने १०,००० महिलांना 'AI' (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रात प्रशिक्षित करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गृह विभागाने विद्यापीठाला बिग डेटा एनालिटिक्स आणि 'फेस रिकग्निशन सिस्टमविकसित करण्यासाठी १७ कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण प्रकल्प मिळाला आहे आहे. एम.टेक आणि बी.टेकचे विद्यार्थी प्राध्यापकांबरोबर यावर काम करत आहेत. विद्यापीठाने फ्रान्समधील रुबिकाअमेरिकेतील ईस्ट टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटी आणि जर्मनीतील लाईपझिग युनिव्हर्सिटी यांसारख्या जागतिक संस्थांशी करार केले आहेत. जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन ७०० विद्यार्थ्यांना परदेशात रोजगारक्षम  करण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटर च्या अंतर्गत २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टार्टअपसाठी प्रत्येकी २५,००० रुपये  दर महाएका वर्षासाठी 'अमृत फंडिंगदेण्यात आले आहे. तसेच राज्यातील १६० महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. रॅम्प (RAMP) प्रकल्पांतर्गत सुमारे १०,००० महिलाविद्यार्थी व युवक यांना लघू व मध्यम उद्योगासाठी रोजगारक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहेज्याचा विस्तार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांत झाला आहे असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi