Saturday, 28 March 2026

पीएम आरकेव्हीवाय अंतर्गत अतिरिक्त निधीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट ·

 पीएम आरकेव्हीवाय अंतर्गत अतिरिक्त निधीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी

घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट

·         पुढील काही दिवसांत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच केंद्रय कृषी मंत्र्यांच आश्वासन

 

मुंबईदि.२७: महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकासशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असूनया योजनांमध्ये शेतकऱ्यांचा वाढता सहभागही दिसून येत आहे. मात्रया वाढत्या प्रतिसादामुळे काही महत्वाच्या योजनांसाठी मंजूर निधी अपुरा पडत असल्याने अतिरिक्त निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवरप्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम-आरकेव्हीवायअंतर्गत अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi