Friday, 27 March 2026

महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी

 हत्तीरोग निर्मूलनासाठी ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.२६ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिनडीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून फिलेरियासिसचा पूर्णतः नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,विशेषतः दुर्लक्षित असलेल्या फिलेरियासिससारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली होती. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम  महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या  औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र शासनाकडे  विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातीलविशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेचभारतातून फिलेरियासिस निर्मूलन करण्याच्या   पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीतही  मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi