Friday, 20 March 2026

राज्य विद्यापीठांनी स्कूल - कनेक्ट व महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसिद्धा उपक्रम कसोशीने राबवावेत

 राज्य विद्यापीठांनी स्कूल - कनेक्ट व महिला सक्षमीकरणासाठी

स्वयंसिद्धा उपक्रम कसोशीने राबवावेत


- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि.17 : राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंशी लोकभवन, मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. विद्यापीठांनी आपले राष्ट्रीय मानांकन सुधरवावे व त्यासाठी वेळोवेळी लक्ष निर्धारित करावे अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली. 


राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी या दृष्टीने विद्यापीठांनी शाळा - शाळांशी संपर्क वाढवावा व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे. या दृष्टीने 'स्कुल - कनेक्ट' या कार्यक्रमाअंतर्गत विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे, अशी महत्वाची सूचना राज्यपालांनी केली. हा कार्यक्रम राबवताना नवीनता व चाकोरीबाहेरच्या संकल्पना रुजू कराव्या असेही राज्यपालांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi