Friday, 27 March 2026

महिला व बालकांच्या पोषणात मोठी सुधारणा करण्याचे लक्ष्य

 महिला व बालकांच्या पोषणात मोठी सुधारणा करण्याचे लक्ष्य

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात कुपोषणाविरुद्ध निर्णायक पाऊल;

महिला-बाल आरोग्यासाठी महिला आणि बालविकास आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

मुंबईदि. 26: राज्यातील कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळवून महिला व बालकांच्या आरोग्य आणि पोषणात लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (CIFF) यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असूनया भागीदारीमुळे मातृ व बाल पोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली जाईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या उपस्थितीत हा करार झाला. यावेळी  तर्फे  चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक मंजुला सिंग,  डायरेक्टर स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्ज अँड पार्टनरशिप्स अखिल पाळीअथ आणि अन्य वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.या कराराअंतर्गत कुपोषणावर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष भर देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi