Friday, 27 March 2026

बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले असून, या महिलांना लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्डच्या सहकार्याने

 बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले असून, या महिलांना लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्डच्या सहकार्याने दिले जाणारे प्रशिक्षण, भांडवल आणि मार्गदर्शन यामुळे व्यवसाय उभारणीसाठी तसेच उत्पादने बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी मोठी मदत मिळत आहे.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीग्रामीण भागातील अनेक महिला ऑनलाईन व्यवहार करत असताना डिजिटल प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा वेळी डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या माध्यमातून दिले जाणारे हे प्रशिक्षण महिलांना अधिक सक्षम बनवत असूनअशा उपक्रमांचा विस्तार राज्यभर होणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्गपुणे आणि रायगड जिल्ह्यांत सुरू असलेले हे कार्य राज्यभर विस्तारावेजेणेकरून अधिकाधिक ग्रामीण महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतीलअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिला व बालविकास विभागमहिला विकास मंडळ आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करून हा लाभ अधिक महिलांपर्यंत पोहोचवावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi