तरुण भारतने राष्ट्रवादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविला-नितीन गडकरी
तरुण भारतला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, त्याने आपली वैचारिक भूमिका कधीही सोडली नाही. रा.स्व. संघाचा राष्ट्रवादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम तरुण भारतने सातत्याने केले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी बोलताना काढले. या शतकपूर्तीच्या इतिहासात भाऊसाहेब माडखोलकर यांच्यासह सर्वांचेच अत्यंत मोलाचे योगदान आहे, असेही ते म्हणाले. यावेळी रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांच्या कार्याची नोंद घेणाऱ्या समर्पण या विशेषांकाचे तसेच शताब्दीपूर्तीनिमित्त काढण्यात आलेल्या अविरत या विशेष पुरवणीचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडले.
No comments:
Post a Comment