Tuesday, 31 March 2026

राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त

'शिवशाही पुनर्वसनप्रकल्पाला बळकटी

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. ३० : बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होतीतोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. पारदर्शकता आणि वेग ह्याला आमची प्राथमिकता असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आता खासगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात 'विशेष संयुक्त उपक्रम' (एसपीव्ही) तयार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेमुंबईसह राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'शिवशाही पुनर्वसन प्रकल्पा'ला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi