व्यसनमुक्तीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी
– सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजातील अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखी भूमिका बजावली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात, मात्र या क्षेत्रात कार्य करणारे लोक समाजासाठी आशेचा किरण आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काय करावे आणि काय टाळावे हे स्वतः ठरवायचे असते, पण व्यसनाच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तींना योग्य दिशेला आणणे हे अत्यंत कठीण आणि महत्त्वाचे काम आहे.
पुरस्कार हा केवळ सन्मान नसून कार्यकर्त्यांच्या कष्टांची दखल आहे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
व्यसनामुळे केवळ व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे. एखादे कुटुंब वाचविणे हेच मोठे यश असून त्यातून मिळणारा आशीर्वाद हा खरा ठेवा आहे, असेही मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.
पुरस्कारांतंर्गत व्यक्तीगत पुरस्कारासाठी रु.१५ हजार सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह,शाल,साडी, खण आणि श्रीफळ तसेच संस्था पुरस्कारासाठी रु. ३० हजार सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ याप्रमाणे पुरस्काराचे वितरण करण्यात आले या ५ वर्षांच्या पुरस्कार निवडीमध्ये एकुण १०० व्यक्ती व १३ संस्थांचा समावेश आहे. या १०० व्यक्तींपैकी ८८ पुरुष व १२ महिलांचा समावेश होता
कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणि संस्थांनी मनोगत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, तर आभार विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment