Friday, 20 March 2026

अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी अन्यत्र वळवलेला नाही सामाजिक न्याय विभागाचे स्पष्टीकरण

 अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी अन्यत्र वळवलेला नाही

सामाजिक न्याय विभागाचे स्पष्टीकरण

 

मुंबई, दि. २० : अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी अन्यत्र वळविण्यात आलेला नाही. हा निधी संबंधित लाभार्थ्यांवरच खर्च करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा वार्षिक योजना (अजाउयो) तसेच इतर मंत्रालयीन विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी सन २०२५-२६ करिता २२,६५८ कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. यापैकी १७,६०७.२७ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला असून १३,४२०.४२ कोटी रुपये, म्हणजेच ७६.२२ टक्के इतका खर्च झाला आहे. उर्वरित निधीचे वितरण व खर्चर करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi