Tuesday, 31 March 2026

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल

 आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल

           -मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई,दि.३०: कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी आयडिएशन कॉम्पिटिशन ३.० ही उद्योजकतेकडे वाटचाल करण्याची व नवकल्पनांना चालना देणारा उपक्रम ठरेल असे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण सोसायटी आणि आयस्पार्क फांउडेशन यांच्या पुढाकाराने आयडिएशन कॉम्पीटीशन ३.० ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात मंत्री लोढा बोलत होते.


अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नवकल्पनांना चालना देणा-या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पाटील यांनी राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती दिली.


रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी इनक्युबिशेनसाठी आवश्यक असलेली सर्व मदत विद्यापीठाच्या वतीने दिली जाईल. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता सहभाग पाहून स्टार्टअप इकोसिस्टमला मिळणारे बळ स्पष्ट होत आहे असेही त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi