Saturday, 21 March 2026

सरस प्रदर्शनातून उत्पादनाची सरस विक्री

 सरस प्रदर्शनातून उत्पादनाची सरस विक्री

ग्रामविकास विभागाच्या मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सुनीता यांना विक्रमी विक्रीचा अविस्मरणीय अनुभव प्रत्यक्ष घेता आलाया प्रदर्शनात अन्नपूर्णा फूड प्रॉडक्टसच्या उत्पादनांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यातून सुनीता यांनी आपल्या उत्पादनांची थोडी थोडकी नव्हे तर थेट  १२ लाख रुपयांची विक्री केलीरेणापूर तालुक्यातील छोट्याशा गावातून सुरु केलेल्या व्यवसायाच्या उत्पादनांची इतकी मोठी विक्री होणे हे त्यांचे मोठे यश होतेकारण या विक्रीतून त्यांचा आत्मविश्वास वृद्धीगंत होऊन उद्योगाचे नवीन दालन त्यांच्यासमोर खुले झाले. व्यापक स्वरुपातील बाजारपेठेची ओळख आणि प्रत्यक्ष सहभागी होण्याचा अनुभव त्यांना पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणा देणारा आहे.

 

आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सुनीता यांना व्यवसाय वाढवण्यासाठी शासन योजनांच्या माध्यमातून उत्तम सहकार्य मिळत असून (पीएमएफएमई) योजनाशासकीय अनुदानमशिनरीपॅकेजिंग यूनिट यासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठीची प्रक्रिया त्यांनी सुरु केली आहे. आवळ्याचे उत्पादन आरोग्यदायी आहेत्याला मोठी मागणी आहे, आणि भविष्यात अन्नपूर्णा’ हा ब्रँड संपूर्ण भारतात पोहोचेल या विश्वासातून कार्यरत सुनीता यांचा हा प्रेरणादायी प्रवास इतरांच्या उमेदीला निश्चितचं बळ देणारा आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi