व्हर्च्युअल हॉस्पिटल्स आणि डिजिटल ट्विन्समुळे आरोग्य सेवेत मोठी क्रांती
- पल्स परिषदेत तज्ज्ञांनी केले मत व्यक्त
मुंबई, दि . 27 : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित ‘पल्स’ परिषदेत व्हर्च्युअल हॉस्पिटल्स, डिजिटल ट्विन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवेत मोठी क्रांती घडत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
"व्हर्च्युअल हॉस्पिटल्स, डिजिटल ट्विन्स" या चर्चासत्रात डॉ. संजीव कुबकड्डी, डॉ. महेश कप्पानियिल, डॉ.मयूर विभूती, पंकज राऊत तसेच मार्टिन बूस्मन या तज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर सविस्तर मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment