Monday, 16 March 2026

शासनाने योजनेतील उपचारांच्या संख्येत 1356 वरून 2399 पर्यंत वाढ केली आहे तसेच उपचारांच्या दरामध्येही वाढ

 शासनाने योजनेतील उपचारांच्या संख्येत 1356 वरून 2399 पर्यंत वाढ केली आहे तसेच उपचारांच्या दरामध्येही वाढ केली आहे. रुग्णालय अंगीकरणाची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पारदर्शक आणि विहित कालमर्यादेत पार पाडण्यात येत आहे. रुग्णालयांनी गुणवत्ता विषयक निकष पूर्ण केल्यास अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम देण्यात येत आहे. रुग्णालयांच्या दाव्यांची अदायगी कमीत कमी कालावधीत आणि नियमितपणे केली जात आहे. गेल्या सुमारे एक वर्षात घेतलेल्या सुधारणात्मक निर्णयांमुळे रुग्ण संख्येतउपचारांत आणि त्यावरील खर्चातही चांगली वाढ झाली आहे. या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना अधिक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून यामध्ये जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi