भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
· शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस चे महत्व याविषयी मार्गदर्शन
मुंबई, दि.२० : भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने विविध विषयांवर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय लोक प्रशासन संस्था प्रादेशिक शाखा मंत्रालय, मुंबईचे मानद खजिनदार विकास विनायक देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक यशवंत बर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टल यासंदर्भात उद्योग संचालनालयाचे उपसंचालक (मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना) नितीन कोळेकर आणि उद्योग संचालनालयातील जीईएम पोर्टलचे तज्ञ कार्यकारी शैलेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment