शासनाच्या खरेदी धोरणावर नितीन कोळेकर यांनी सखोल मार्गदर्शन शासनासाठी लागू असलेल्या खरेदी नियमावली व धोरण २०१६, खरेदीचे विविध प्रकार, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच अनुसूचित जाती/जमाती आणि महिला उद्योजकांसाठी असलेले आरक्षण याबाबतही सविस्तर माहिती दिली. शासनाच्या विभागांतर्गत अंगीकृत उपक्रमांसाठी दर निश्चिती, आरक्षणाची तरतूद, तसेच स्टार्टअप घटकांसाठी देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक योजनांची माहिती त्यांनी स्पष्ट केली.
याशिवाय मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेची भूमिका, महाराष्ट्र शासनाने जीईएम पोर्टल स्वीकारण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि शासनाकडील वस्तू व सेवांची खरेदी जीईएम पोर्टलद्वारे कशी केली जाते, त्यांनी मार्गदर्शन केले. (शासकीय खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता, स्पर्धात्मक दर आणि कार्यक्षमतेसाठी जीईएम पोर्टलचे महत्त्व त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment