Saturday, 28 February 2026

९८३३४९८३३४ या महामार्ग पोलीस विभागाच्या प्रवाशांच्या मदतीकरीता असलेल्या क्रमांकावर प्राप्त कॉल्सवर

 मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दि. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहतूक करणारा कोची, केरळ येथून सुरत, गुजरात येथे जाण्याकरिता निघालेला टॅंकर पलटी होऊन त्यामधील ज्वलनशील वायूची गळती सुरु झाली होती.  त्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून घटनेबाबत प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमातून माहिती प्रसारित करण्यात आली होती. तसेच हेल्पलाईन क्र. ९८३३४९८३३४ या महामार्ग पोलीस विभागाच्या प्रवाशांच्या मदतीकरीता असलेल्या क्रमांकावर प्राप्त कॉल्सवर घटनेची माहिती तसेच वाहतुकीच्या परिस्थितीची माहिती देण्यात येत होती. ठिकाणी महामार्ग पोलीस, रायगड जिल्हा पोलीस दल, फायर ब्रिगेड, एनडीआरएफ, एसडीएमए, बीपीसीएल, हेल्प फाऊंडेशन, काही केमिकल तज्ज्ञ, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल हे घटना घडल्यापासून वायू गळती रोखून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi