Friday, 20 February 2026

मुंबई उपनगर जिल्हा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

 







मुंबई उपनगर जिल्हा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त

भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

 

मुंबई दि. 19 : मुंबई उपनगर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन मुंबई उपनगर जिल्हा व माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य पदयात्रा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित प्रभावी पथनाट्य, मर्दानी व पारंपरिक खेळांचे सादरीकरण तसेच ढोल-ताशांच्या गजरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन वेधले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि निवासी जिल्हाधिकारी सतीश बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पदयात्रेत नॅशनल कॅडेट कॉप्रस, नॅशनल सर्व्हिस स्किम, भारत स्काऊटस ॲण्ड गाईडस (National Cadet Corps, National Service Scheme, Bharat Scouts and Guides) विविध लेझीम पथके तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi