शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात 'एआयएफ' संस्था
महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक
नवी दिल्ली दि. 11 : महाराष्ट्रातील आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत परिवर्तनासह कौशल्य विकासासाठी 'अमेरिकन इंडिया फाऊंडेशन' (एआयएफ) आणि महाराष्ट्र शासन संयुक्तपणे काम करणार आहे. 'एआयएफ'चे संचालक कामेश संघी यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे नवी दिल्लीतील निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली अमेरिकन इंडिया फाऊंडेशन' संस्था शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार महाराष्ट्रात विविध प्रकल्प राबवण्यास उत्सुक आहे. या भागीदारीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधेला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच कौशल्य विकासासाठीही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. 'एआयएफ'ने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्राधान्यक्रमांनुसार संयुक्तपणे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्रातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करणे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कौशल्य विकास प्रकल्प राबवणे यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
No comments:
Post a Comment