Wednesday, 11 February 2026

भारतातील विविध राज्यांमध्ये कार्य करण्याचा अनुभव 'एआयएफ'कडे

 गेल्या अडीच दशकांपासून भारतातील विविध राज्यांमध्ये कार्य करण्याचा अनुभव 'एआयएफ'कडे आहे. या अनुभवाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करण्याबाबत गुंतवणूक आयुक्त गायकवाड यांनी  यावेळी चर्चा केली.

 

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामाजिक उत्तरदायित्व आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरते. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत 'एआयएफसोबत काम केल्यास तळागाळातील घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल असा विश्वासही निवासी गुंतवणूक आयुक्त गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

 

अमेरिकन इंडिया फाऊंडेशनचे संचालक संघी यांनी यावेळी संस्थेच्या गेल्या 25 वर्षांतील कार्याचा आढावा सादर केला आणि महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक ते सर्व तांत्रिक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi