देशाच्या पर्यटन विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प
-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
लोककल्याण, रोजगार निर्मिती,सर्वसमावेशक आर्थिक सुधारणांवर भर देणारा अर्थसंकल्प
मुंबई, दि.१ : प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने घेतलेलं महत्वपूर्ण निर्णय आहेत. या अर्थसंकल्पात देशाच्या पर्यटनाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. आजचा अर्थसंकल्प लोककल्याण, पर्यटनातून रोजगार निर्मिती, सर्वसमावेशक आर्थिक सुधारणांवर भर देणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment