Thursday, 19 February 2026

कोरोना पूर्वीचा सुवर्णकाळ … आणि नंतरची घसरण

 कोरोना पूर्वीचा सुवर्णकाळ

… आणि नंतरची घसरण

कोरोना महामारीपूर्वी एसटीकडे १८ ते १९ हजार बसेस होत्या. दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते. मात्र महामारी आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या चार-पाच वर्षांत बसखरेदी रखडली. परिणामी २०२४ अखेर बसेसची संख्या घटून सुमारे १२,६०० वर आली. दरम्यानराज्य शासनाने महिलांना तिकिटात ५०% सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला. सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतातमात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi