Wednesday, 4 February 2026

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; महिला उद्योजकता, आरोग्य, पायाभूत सुविधा व ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा

 केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;

महिला उद्योजकता, आरोग्यपायाभूत सुविधा व ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा

-राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर

 

मुंबई,दि.३ : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राला भरीव व विक्रमी निधी मंजूर करण्यात आल्याने राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळाले असून महिला सक्षमीकरणसार्वजनिक आरोग्यपायाभूत सुविधाऊर्जा आणि रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत परिवर्तनकारी बदल घडणार असल्याचे ऊर्जामहिला व बालविकाससार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कर वाटपापोटी ८९,८५५.८० कोटी रुपये तर केंद्रीय सहाय्य अनुदानापोटी ५०,५११ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्याला दीर्घकालीन, व्याजमुक्त कर्जाच्या स्वरूपात अतिरिक्त मदत मिळणार आहे. यामुळे राज्यातील विकासकामांना वेग मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi