विकसित महाराष्ट्र’साठी पायाभूत संस्थांची ठोस दिशा: ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेत विकासदृष्टी सादर
मुंबई, दि. 19 : परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषदेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पायाभूत व औद्योगिक संस्थांच्या प्रमुखांनी राज्याच्या उद्योगविकास, गुंतवणूक वाढ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या ध्येयपूर्तीसाठी ठोस दिशा मांडली.
मुंबई येथे आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे (CIDCO) व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे (MIDC) सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य गुंतवणूक व नियोजन अधिकारी (MMRDA) डॉ.शंकर देशपांडे यांनी सहभाग घेत राज्यातील चालू व नियोजित विकास प्रकल्पांची माहिती दिली.
No comments:
Post a Comment