Saturday, 28 February 2026

ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश

 ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या

वाहतूकीची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई,दि. २८ : महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती  एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले  असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रोपिलिन ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्याने झालेल्या वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य जयंत पाटीलआदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi