आयटीएमएस प्रणाली कार्यरत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भविष्यात पुन्हा कधी अशी दुर्घटना घडून नये यासाठी अशा पदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना यासंदर्भात एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून या पद्धतीच्या आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षित उपाय तातडीने करण्यासाठीची रेस्क्यु यंत्रणा, साधनसामुग्री आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे यादृष्टीने यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या संबंधित कंपन्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून, योग्य मार्गदर्शक सूचना ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर बसवण्यात आलेली आयटीएमएस ही प्रणाली सध्या कार्यरत आहे. या प्रणालीचा उपयोग करून अशा प्रकारच्या अपघाताच्या प्रसंगी माहिती नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचवता येईल आणि ट्रॅफिकचे व्यवस्थापन, नियंत्रण, तसेच डायव्हर्शन सुकर करता येईल. आयटीएमएस चा उपयोग करुन अशा घटनांमध्ये प्रवाशांना तातडीने याबाबतची सूचना देण्यासाठीची ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन या वाहतूक कोंडीच्या कालावधीत ३६ तासात वसुल करण्यात आलेला टोल हा संबंधित मालकांना परत देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच इतर प्रगत देशांमध्ये अशा आपातकालिन परिस्थितीत कोणत्या पद्धतीने तातडीने उपाययोजना राबवण्यात येते याची पडताळणी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment