Saturday, 28 February 2026

पुणे शहरातील आरोग्य सुविधांचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम सुरू

 पुणे शहरातील आरोग्य सुविधांचा

सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम सुरू

– आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई२७ - पुणे शहर झपाट्याने विकसित होत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात. या पार्श्वभूमीवर पुढील १० वर्षांच्या दृष्टीने पुणे शहराच्या आरोग्य सुविधांचा रोडमॅप तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

पुणे शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अति दक्षता विभागाच्या बेडची संख्या वाढविणेअत्याधुनिक सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात विधानसभेचे सदस्य सुनिल कांबळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी उत्तर दिले. 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi