Saturday, 7 February 2026

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग 10 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांच्या मुलाखतीचा

दुसरा भाग 10 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार

 

मुंबईदि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया जनजागृती मोहिमेवर आधारित विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येत आहे. या मुलाखतीचा पहिला भाग नुकताच प्रसारित झाला असून दुसरा भाग मंगळवार10 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.

 

या भागामध्ये डॉ. कंदेवाड यांनी सिकलसेल ॲनिमियाचा प्रतिबंधरुग्ण व वाहकांची ओळखविवाहपूर्व आणि गर्भावस्थेतील तपासणीचे महत्त्व तसेच शासनामार्फत उपलब्ध मोफत तपासणी व उपचार सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सिकलसेल ॲनिमिया हा अनुवांशिक रक्तविकार असून त्याचा प्रादुर्भाव विशेषतः आदिवासी व दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी अरुणोदय’ जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले आहे. या मुलाखत निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतली आहे.

 

तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध राहणार असून पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi