Thursday, 1 January 2026

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

 सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी

अर्ज सादरीकरणा मुदतवाढ

 

मुंबईदि. १ : सैनिक कल्याण विभागमहाराष्ट्र राज्यपुणे यांच्यामार्फत लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहेअर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुंबई शहराचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

या भरतीसंदर्भातील जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होतीतर शुद्धिपत्रक ७ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आले होते. संबंधित भरतीसाठी विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणास्तव सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रीय झाल्याने इच्छुक उमेदवारांना वेबलिंकपर्यंत पोहोचण्यात अडचण येत असल्याने मुदत वाढ देण्यात आली आहे.

 

विभागाने दिलेल्या माहितीनुसारउमेदवारांनी खालील Web Link किंवा QR Code चा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

अर्जासाठीची लिंक:

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html

 

00000

 


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi