शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरणे, शासकीय विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहार भत्ता नियमित वाढविणे, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करणे, सेमी इंग्रजी माध्यम सुरू करणे, शाळेच्या आणि वसतिगृह इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणे, विद्यार्थ्यांसाठी कॉट, कपाटे, गाद्या, चादरी, बेंचेस ठराविक काळानंतर नवीन घेण्यासाठी निधीची तरतूद करणे, शाळा प्रवेशासाठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढविणे, शाळेच्या संचालनासाठीची परिचय पुस्तिका अद्ययावत करणे, नियामक मंडळात सुधारणा करुन नियमित बैठका आयोजित करणे आदी बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात येऊन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश प्रधान सचिवांनी दिले.
०००००
No comments:
Post a Comment