मौजे कोलशेत येथील जमीन प्रकरणी अहवाल सादर करावा
-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
मुंबई, दि. 19 : ठाण्यातील मौजे कोलशेत येथील विवादित जमीन प्रकरणी पाहणी करुन सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
या बैठकीस महसूल विभागाचे उपसचिव महेश वरूडकर, ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, संबंधित अर्जदार तसेच विकासक उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, मौजे कोलशेत येथील संबंधित जमीन प्रकरणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्यात यावा.
No comments:
Post a Comment